दि.26 जून 2025 रोजी , शांती दूत परिवाराच्या सहाव्या वर्धापनदिनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सुप्रसिद्ध व्याख्याते व निवेदक प्रा.डॉ.सुनिल रुपचंद धनगर यांना सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .शांती दूत परिवाराचा सेवारत्न पुरस्कार हा प्रतिष्ठेचा मानल्या जातो . या अगोदर हा पुरस्कार माजी राष्ट्रपती , माजी राज्यपाल , मराठी व हिंदी अभिनेते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना दिल्या गेलेला आहे .
प्रा.डॉ.सुनिल धनगर हे पुणे येथील सूर्यदत्त इन्स्टिट्युट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते एक उत्तम वक्ते, प्रभावी सूत्रसंचालक आहेत. ‘महाराष्ट्राचे महावक्ते’, ‘शब्दजादुगार’ म्हणून लोकप्रिय आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ शिक्षण आणि वक्तृत्वाच्या उपजत प्रतिभेवर त्यांनी आपली कारकीर्द घडविली आहे. आजतागायत त्यांनी राज्यभरात अनेक प्रेरणादायी व समाजप्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत त्यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘शब्दजादुगार सुनिल’ हे व्यंकटेश कल्याणकर यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांना ‘टेड टॉक्स’, ‘जोश टॉक्स’ आदी लोकप्रिय व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रम दि.26 जून 2025 रोजी LOC HOSPITAL NAVI PETH , PUNE येथे होणार आहे .
शांतीदूत परिवाराच्या वतीने सहाव्या वर्धापन दिना निमित्य येथे रक्तदान शिबिर , ब्राह्मकुमारी राजयोग ध्यान शिबिर , अवयव दान जागृती अभियान हे उपक्रम घेण्यात येणार आहेत .उपरोक्त माहिती शांती दूत परिवाराचे मार्गदर्शक डॉ.विठ्ठल जाधव IPS , विशेष पोलीस महानिरीक्षक , महाराष्ट्र राज्य ( सेवा निवृत्त ) व सौ.विद्याताई जाधव , संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार यांनी कळवली आहे .







